All New Microsoft Window 11 Features 

Windows 11 release of the Windows NT operating system, announced on June 24, 2021, and developed by Microsoft. 
Windows 11 download
सहा वर्षांनंतर मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोजमध्ये अपडेट्स करत Windows 11 च्या रुपात नवीन ऑपरेटिंग सिस्टिम आज लॉन्च केली. या विंडोजमध्ये अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. 

Fresh Look, New Theme, New Start Button, Microsoft Centre आणि बऱ्याच नवीन सुविधा या  Microsoft Windows 11 मध्ये देण्यात आल्या आहेत. 

या आधी मायक्रोसॉफ्ट वर्जन मध्ये डाव्या बाजूला असणारा Start आता Windows 11 मध्ये मध्यभागी असणार आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्स या नव्या विंडोजमध्ये जोडण्यात आल्याने व्हिडीओ कॉल्स आणि मेसेज करणे अधिक सोपं होणार आहे. तसेच विंडोज अपडेटची साईजही कमी केली आली असल्याने डाऊनलोड करणं अधिक सोपे होणार आहे. 

Start Menu आता मध्यभागी आणल्याने या विंडोजमधील अॅप्स किंवा इतर फाईल्स या जलद सर्च केल्या जाऊ शकतील. तसेच स्टार्ट मेन्यूमधील widget आता स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 

महत्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये Microsoft Store देण्यात आलं असून त्यावर अनेक अॅप्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे डाऊनलोड करताना सेक्युरिटी देखील वाढली आहे. 

Microsoft Windows 11 मधील नवीन फिचर्समुळे आता एका पीसीला दुसऱ्या पीसीशी कनेक्ट करणं सोपं झालं आहे. 

नवीन Microsoft Windows 11 मध्ये 1 GHz चा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्यामुळे याची स्पीड मधे वाढ झाली आहे. तसेच यामध्ये 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज वापरण्यात आलं आहे. याचा Display हा 9 Inches चा असून 720p HD Resolution चा वापर करण्यात आला आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post