Rajinikanth biography In Marathi: रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता आहेत. मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, चित्रपटातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आणि ख्यात नाम तमिळ चित्रपट अभिनेते व लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. रजनीकांत यांचे पूर्ण नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड आहे.
तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवाद फेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत हे प्रसिद्ध आहेत.
एम.जी.रामचंद्रन यांच्या नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ओळख आहे. रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.
रजनीकांत हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे.
त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील (‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले.
Rajinikanth biography In Marathi:
‘शिवाजी द बॉस’ चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेर देखील अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.
जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत.
रजनीकांत यांचे पूर्वजीवन
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा हेन्द्रे पाटील कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून त्यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव आणि आईचे नाव जीजाबाई गायकवाड असे आहे.
गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात धाकटे रजनीकांत आहेत.त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी आहे असे सांगीतले जाते.
तसेच जेजूरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत यांनी सकाळ या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
रजनीकांत यांना सत्यनारायण राव गायकवाड आणि नागेश्वर राव गायकवाड हे दोन मोठे भाऊ आणि एक अश्विनी बाळुबाई गायकवाड नावाची एक बहिण ही आहे.
Rajinikanth biography In Marathi:
ऐश्वर्या शिवाजीराव गायकवाड ऊर्फ ऐश्वर्या रजनीकांतआणि सखुबाई शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सौंदर्या रजनीकांत यांच्या दोन मुली आहेत..
शाळेत असतांना गरिबीमुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले होते. बंगळूर येथील आचार्य पाठशाळा या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.
1968-1973 या दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामं केली. त्यानंतर ते बंगळूर बस transport सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून दाखल झाले.
नंतर चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नई ला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले. मद्रास फिल्म इंस्टीट्यूट मध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द 1974-75 मध्ये सुरू केली.
Rajinikanth biography In Marathi
रजनीकांत यांना मिळालेले गौरव, पुरस्कार आणि सन्मान
२००० सालचा भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मभूषण या नागरी गौरवाचे ते मानकरी आहेत.
जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पुरस्कार द फ्युरिअर ने त्यांना सन्मानीत केले गेले आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात सर्वाधिक प्रसिद्धी मुळे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद.(सर्वाधिक जागतिक चाहते असणारा कलाकार.)
जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतिक चित्रपटातील योगदानाबद्दल. टाईम्स मॅगझीन ने रजनीकांत यांना जगातील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे.
आशिया खंडातील चित्रपट उद्योगात जॅकी चॅन नंतरचे सर्वात अधिक मानधन मिळविणारे कलाकार आहेत.
६ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.
९ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.
महाराष्ट्र शासनाचा २००७ चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार) विजेते.
१० वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच लेखक, निर्माता,सहकलाकार, अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार मिळाले आहे.
१९९५ मध्ये आध्यात्मिकतेसाठी “ओशोबिस्मित” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा चेवलिर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेते.
२०१६ पद्मविभूषण पुरस्कार
Rajinikanth biography In Marathi : रजनीकांत यांनी वेळोवेळी तमिळ लोकांसाठी व लोक हक्कांसाठी उपोषण केले आहे.सरकार वर दबाव टाकण्यासाठी त्यांनी नेहमीच समाजघटकांची मदत केली आहे. ते त्यांच्या दानशूर स्वभावासाठी पण त्यांना ओळखले जाते.
३१ डिसेंबर २०१७ रोजी चेन्नई मधील श्री राघवेन्द्र मण्डपम् या ठिकाणी रजनीकांत यांनी एका भव्य सभेमध्ये पत्रकार आणि रसिकांसमक्ष आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचे घोषित केले.
जरूर वाचा : सुभेदार तानाजी मलुसरे Story
More Info : Wikipedia
Tags : Rajinikanth temple,
Rajinikanth wife,
Rajinikanth History,
Rajinikanth birth place,
Rajinikanth daughter,
Rajinikanth marathi movie,
Rajinikanth real name,
Rajinikanth Biography in Tamil,
Note : आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करत राहू. धन्यवाद
Thanks For Reading : Rajinikanth biography In Marathi
Post a Comment