Tanaji Malusare Story in Marathi


Tanaji Malusare Story in Marathi


गड आला पण सिंह गेला – संध्याकाळची वेळ होती आईसाहेब ( जिजाऊ) आपल्या वाड्याच्या संज्यातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक आवाढव्य किल्ला त्यांना दिसत होता. प्रचंड अवघड आणि अभ्य्द्य किल्ला त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा (सिंहगड).


म्हणजेच आजचा सिंहगड. जिजाऊसाहेब आपल्याच विचारात दंग होत्या की त्या किल्ल्यावर मोगली हिरवे निशानचा झेंडा फडकत होता.



“Tanaji Malusare Story in Marathi” – कोंढाणा हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही हा विचार करत असताना तेवढ्यात आपले शिवबा तिथे आले.


त्यांनी पाहिलं कि कोंढाणा किल्लाकडे पाहत आपली आई दंग झाली आहे.


त्यांनी जिजाऊंच्या मनातला विचार ओळखला आणि शिवबा म्हणाले आईसाहेब काय आहे आपल्या मनात – आईसाहेब म्हणाल्या या किल्ल्यावरील हिरव निशाण आम्हाला खूप बोजतंय.


शिवबा म्हणाले आईसाहेब ते आम्हाला पण टोचतंय… शेवटी शिवबा मनात म्हणाले आईची इच्छा आता पूर्ण करायलाच हवी. शिवबांन लगेच आपल्या सर्व मावळ्यांना बोलावून घेतले नंतर सगळे जमा झाले.


आता महाराज कोणती कामगिरी सांगणार ते ऐकायला सर्व मावळ्यांनी कान टवकारले.


शिवाजी महाराजांनी कोंढाणा हा किल्ला घेण्याचा विचार सांगितला व सगळ्यांना विचारलं हि कामगिरी फारच अवघड आहे.


शिवाजी महाराजांनी शब्द टाकला आणि ताडकन एक मावळा उठून म्हणाला - “मी जिंकतो हा कोंढाणा गड”. कोण होता हा मर्द? कोण होता हा हिम्मत बहादूर गडी? तर तो होता तानाजी – तानाजी मालुसरे


शिवाजी महाराजांचा खेळ गडी तानाजी मालुसरे कोकणातल्या उंबरठ या गावचा. तानाजी अंगा पिंडान भरदार होता. छाती तर एखाद्या बुरुजा सारखी बुलंद होती.
Kondhana Tanaji Malusare Story in Marathi


जरूर वाचा : रजनीकांत यांची जीवनी

                    : Christmas Wishes Marathi


Tanaji Malusare Story in Marathi
कोंढाणा  जिंकायला फार अवघड म्हणजे जिवाशी खेळ. पण निधड्या छातीच्या तानाजीने हा खेळ स्वीकारला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ सूर्याजी सुद्धा आला होता.


तानाजी आणि सूर्याजी अगदी राम लक्ष्मण सारखेच होते. खरे म्हणजे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण महाराजांना द्यायला आला होता.


शिवबा म्हणाले हे काम मी दुसर कोणाला तरी सांगतो तेवढ्यात तानाजी ताडकन उठला आणि म्हणाला “आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे” तानाजी ने स्वराज्यासाठी आपले लग्न सुद्धा बाजूला ठेवेले, छत्रपती शिवाजी महाराजाचे स्वराज्याचे काम हे पहिल्यांदा करायचे हा त्याचा बाणा.


मग मध्य रात्रीच तानाजी आपल्या पाचशे मावळ्यांना घेऊन कोंडण्याकडे निघाले आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या.


गडाजवळ भरपूर अंधार पडला होता, पाय न वाजवता तानाजी व पाचशे मावळे कोंढाणा गडाजवळ जमा झाले.


गडाचा किल्लेदार उदयभान नावाचा रजपूत सरदार होता. सिंहगड फार बळकट किल्ला. गडाच्या खाली पायथ्याशी घनदाट झाडी होती. गडावर प्रवेश करायला फक्त दोनच दरवाजे होते.


सिंहाच्या जबड्यासारखे, गडावर कडक पहार होता, पण तानाजी जिकडे उभा होता तिथे खोल दरी होती.


त्यामुळे तिकडून कोणी येऊ शकणार नाही म्हणून तिथे पहारा नव्हता. हीच बाजू तानाजीने निवडली.


आपल्याबरोबर तानाजीने सर्व मावळे घेऊन त्या दरीतून गडावर घोरपडी द्वारे घुसकोरी केली. उदयभान च्या सैनिकांना समजले आणि युद्ध सुरु झाले.


मावळे भराभर गड चढून वर गेले गडावरच्या पहारेकऱ्यांना समजले आणि सैनिक व मावळ्यांच्या मध्ये घनघोर युद्ध जपले.


Tanaji Malusare Story in Marathi

उदयभान आणि तानाजी तलवार घेऊन मैदानात उतरले आणि एकमेकांशी लढू लागले. ते इतक्या जोरात लढत होते कि जणू दोन ढगच एकमेकांवर आपटत होते. तेवढ्यात उदयभानाचा एक घाव तानाजीच्या ढाल वर पडला तो घाव इतका जबरदस्त होता कि त्यामध्ये तानाजीची ढाल तुटली. आता काय?


Tanaji Malusare Story in Marathi”  तानाजी डगमगला नाही त्याने आपला फेटा हातावर गुंडाळला आणि लागला कि लढयाला बहादूर पने.


पण घात झाला आणि एकमेकांचा घाव एकमेकांवर पडून नंतर दोघेही खाली पडले. तानाजीला खाली पडलेलं पाहताच सगळे मावळे घाबरून पळायला लागले.


तेवढ्यात सूर्याजीने ते पहिले आणि गेला धावत कड्याजवळ आणि ज्या दोरावरून चढून वर आले होते ते दोरच कापले आणि म्हणाला –


‘अरे असे भेडा सारखे पळता काय आता महाराज्यांना काय काळे तोंड दाखवाल’.


गड जिंकून दाखवा आपल्या आईचे दुध पिला असाल तर माघारी फिरा, मग काय दुप्पट वेगाने मावळे पळाले आणि उदयभान च्या सैनिकांना मारू लागले. ते मारणे पाहून उदयभान चे सैनिक पळू लागले, आणि शेवटी मावळे विजयी झाले.


गढ आला पण सिंह गेला

 

Tanaji Malusare Story in Marathi” शिवाजी महाराज आपल्या महालातून कोंढान्या कडे पाहतच होते. तेवढ्यात महाराजाना गडावर आग पेटलेली दिसली.


शिवाजी महाराजाना बातमी समजली कोंढाणा गड ‘स्वराज्यात’ आला, मावळे जिंकले कारण तशी खूनच ठरली होती कि गड जिंकला कि तिथली गवतांची गंज पेटवायची, दुसऱ्या दिवशी विजयाची बातमी सांगायला सूर्याजी महालात आले.


पण बरोबर तानाजी नव्हते, महाराजांनी विचारले कुठे आहे माझा तान्हा तर सुर्याजीच्या डोळ्यात पाणी आले,


महाराज शत्रूशी लढताना आपला तान्हा स्वर्गात गेला.    महाराज म्हणाले माझा तानाजी गेला “गढ आला पण सिंह गेला”.


Note : आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करत राहू. धन्यवाद


तुम्हाला हा [ Tanaji Malusare Story in Marathi ] लेख आवडला असेल तर नक्की share करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post